Punjab Corona | पंजाबमध्ये कोरोनाचा उद्रेक; शाळा सुरू होताच 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

पंजाब : वृत्तसंस्था – Punjab Corona | देशात मागील तीन महिन्यात कोरोनाच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेने उद्रेक केला होता. अनेक राज्यात दैनंदिन बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत होती. मात्र, त्या तुलनेत सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. अनेक राज्यात बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. असा साधारण दिलासा दिला असतानाच काही भागात पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू उद्भवू लागल्याचा दिसत आहे. अशीच परिस्थिती पंजाब (Punjab Corona) राज्यात दिसून आली आहे. या राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सरकारने (Government of Punjab) नुकतंच शाळा सुरु केले आहे. या दरम्यान येथील लुधियानामधील (Ludhiana) 2 शाळेतील एकूण 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची (Corona to 20 students) बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. यावरून तेथील सरकारचा निर्णय त्यांच्याच अंगलटी येतो कि काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असेल तर शाळा सुरु करणे महत्वाचे नसणार आहे.

या दरम्यान, लुधियानाच्या सरकारी सिनिअर सेकंडरी स्कूल (Government Senior Secondary School) बस्ती जोधेवाल शाळेतील 8 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) म्हणून सापड्ले आहेत.
तसेच, हे विद्यार्थी इयत्ता 11 वी आणि 12 वीचे आहेत.
यादरम्यान, यांनतर संबंधित महाविद्यालय आणि शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे.
तसेच तेथील सर्व विद्यार्थ्यांनी स्वत: गृह विलगीकरणात राहिले आहेत.

Web Title :- Punjab Corona | 20 children 2 schools ludhiana found be positive covid19 says deputy commissioner vk sharma

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | पुणे पोलीस दलातील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; प्रचंड खळबळ

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 151 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यातील निर्माण कन्स्ट्रक्शनकडून 1 कोटीची फसवणूक, 6 जणांवर FIR