Punjab Cricket Association | हरभजन सिंगच्या आरोपानंतर PCA अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Punjab Cricket Association | आपल्या देशात क्रिकेट (Cricket) हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. यामुळे देशभरात क्रिकेट असोसिएशनवर मोठा व्याप असतो. हा व्याप कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याची स्वत:ची एक क्रिकेट असोसिएशन (Cricket Association) आहे, जिच्या माध्यमातून राज्याचा क्रिकेट कारभार बघितला जातो. मात्र आता या असोसिएशन्समध्ये राजकारण आणि भ्रष्टाचाराची (Corruption) प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. यामध्ये पंजाब क्रिकेट असोसिशनचा (Punjab Cricket Association) समावेश झाल्याने असोसिशनचे अध्यक्ष गुलजारसिंग चहल (Gulzar Singh Chahal) यांनी तडकाफडकी राजीनामा (Resignation) दिला आहे.

 

हरभजन सिंगने केले गंभीर आरोप
राज्यसभा खासदार असलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh) हा पीसीएचा (Punjab Cricket Association) मुख्य सल्लागार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हरभजन सिंगने पीसीएमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला होता. पीसीए सदस्य आणि जिल्हा युनिट्सला पाठवलेल्या पत्रात त्याने कोणत्याही पदाधिकाऱ्याचे नाव घेतले नव्हते. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांनाही हे पत्र पाठवण्यात आले. यानंतर गुलजारसिंग चहल यांनी पीसीए अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

 

काही दिवसांपूर्वी गुलजार चहल हे पीसीएच्या आजीवन सदस्य आणि वरिष्ठ ग्राउंड्समनबरोबर केलेल्या गैरवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते.
चहल यांचे वडील स्टेडियममध्ये फिरण्यासाठी गेले असता ग्राउंड्समनने त्यांना हटकलं.
हि गोष्ट गुलजार चहल यांना समजताच त्यांनी ग्राउंड्समनशी गैरवर्तन केले होते.

 

Web Title :- Punjab Cricket Association | cricket pca chief gulzar inder chahal resigns after harbhajan singh allegations of illegal activities

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दांडेकर पुल परिसरात दोन टोळक्यात राडा; 16 जण ताब्यात

Police Recruitment | राज्यात पोलीस भरती होणार; 11 हजार 443 पदे भरली जाणार

ST Fare Hike | सर्वसामान्यांसाठी वाईट बातमी, दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला, प्रवास भाड्यात 75 रुपयांपर्यंत हंगामी वाढ