प्रियकराशी भेटण्यास जावु देत नव्हता पती, रागात आलेल्या पत्नीन कट रचून केलं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पती प्रियकराला भेटू देत नसल्यामुळे पत्नीनेच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील लुधियानामध्ये घडली आहे. पत्नीने नवऱ्याची हत्या करण्यासाठी एका सुपारी किलरचा देखील वापर केला आहे. आरोपी महिला पुष्पिंदर कौरला पोलिसांनी अटक केली आहे.

पुष्पिंदर कौरचा पती हरविंदर पाल सिंह एक व्यावसायिक होता. पुष्पिंदर लुधियानातील सेंट्रल टाउनमध्ये एक इन्स्टिट्यूट चालवते आणि तिचे 26 वर्षीय जसप्रीत सिंह नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी कॉन्ट्रॅक्ट किलर राजेश कुमार उर्फ जिंदाल याला देखील अटक केली आहे. पत्नीने या हत्येसाठी किलर ला तीन लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी आरोपींकडून बर्फ तोडण्याचे हत्यार, उषा, हॅन्डग्लोज, रक्ताने माखलेला रुमाल अशा अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत.

आरोपी असलेल्या पत्नीने पोलिसांची परवानगी न घेता पतीच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार पोस्टमार्टम होण्याआधीच करून टाकले. त्यानंतर तिने स्वतः आपल्या नातेवाईकांना फोन करून पतीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची खोटी बातमी दिली. मात्र तिच्या सासूला यावर संशय आला आणि त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली.

पोलिसांनी पुष्पिंदरची चौकशी केल्यानंतर तीने असे म्हंटले की, तिचा पती हरविंदरने प्रियकर जसप्रीतला भेटण्यासाठी विरोध केल्यामुळे तिने हरविंदरची हत्या घडवून आणली. यासाठी तिने हरविंदरच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि तो बेशुद्ध होताच त्याचा गळा कापला. तसेच यासाठी तीने जिंदल नामक व्यक्तीला एक लाख रुपये दिले असल्याचे देखील सांगितले.

या प्रकरणाबाबत हजगर्जीपणा केल्यामुळे पोलीस कमिशनरांनी एसएचओ सुखदेव सिंह आणि सदर पोलीस स्थानकाचे एएसआय अश्वनी कुमार यांना तत्काळ निलंबित केले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी