Republic Day Violence : दिल्ली हिंसेत आतापर्यंत 15 FIR दाखल, पंजाबचा गँगस्टर ‘लक्खा’चे नाव आले समोर

नवी दिल्ली : दिल्लीच्या रस्त्यांवर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेवर (Republic Day Violence ) टीका होत आहे. शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान झालेल्या उपद्रवात दिल्ली पोलिसांना सुद्धा निशाणा बनवण्यात आले. तर दिल्ली पोलिसांनी या हिंसाचाराबाबत तपास वेगाने सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, सेंट्रल दिल्लीत झालेल्या हिंसाचारात गँगस्टर आणि अ‍ॅक्टिव्हिस्ट लख सदानाच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे.

सूत्रांनुसार, सेंट्रल दिल्लीत लक्खा सिदाना आणि त्याच्या निकटवर्तीयांवर दिल्ली पोलिसांवरील हल्ल्याची भूमिका समोर आली आहे. हे सर्व सेंट्रल दिल्लीत झालेल्या हिसेंत सहभागी होते. लक्खा सिदानावर पंजाबमध्ये 2 डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. यामध्ये गँगस्टर अ‍ॅक्ट सुद्धा आहे. सिदाना शेतकरी आंदोलनात खुप दिवसांपासून सक्रिय आहे. पोलीस सध्या त्याच्या भूमिकेबाबत तपास करत आहेत.

दिल्ली पोलिसांनी 26 जानेवारीला हिंसक झालेल्या जमावाच्या हल्ल्यात आतापर्यंत 153 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबतीत आतापर्यंत 15 एफआयआर दाखल आहेत, ज्यामध्ये ईस्ट दिल्ली, द्वारका आणि पश्चिमी दिल्लीत 3-3 एफआयआर, 2 आऊटर नार्थ, एक शाहदरा आणि एक नार्थ जिल्ह्यात दाखल झाला आहे, ही संख्या वाढू शकते. दिल्लीच्या 6 जिल्ह्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरमध्ये बंड, सरकारी संपत्तीचे नुकसान आणि हत्यार लुटण्याच्या कलमांचा समावेश आहे.