‘या’ राज्यातील सर्व शहरात पुन्हा Night lockdown !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एनसीआरमध्ये ( National Capital Region) कोरोनाची गंभीर स्थिती पाहता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt.Amarinder Singh) यांनी बुधवारी (दि. 25) राज्यात नवीन निर्बंध लागू केले आहेत, पंजाबमधील सर्व शहरांत व बाजारपेठांमध्ये पुन्हा रात्रीची संचारबंदी लावण्याची घोषणा केली आहे. तसेच येत्या 1 डिसेंबरपासून मास्क न घालणे आणि सोशल डिस्टेन्सिंगचं पालन न करणाऱ्यांकडून 500 रुपयांऐवजी 1000 रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे.

पंजाबमधील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्न सोहळे रात्री 9.30 वाजता बंद होतील, रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी असणार (Covid19 cases, we have decided to impose night curfew from 10 PM to 5 AM starting) आहे. पंजाब सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, 15 डिसेंबर रोजी रात्रीच्या संचारबंदीचा आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. दिल्लीमधील रुग्णांची संख्या लक्षात घेता पंजाब राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यास व अनुकूलित करण्याचा निर्णयही घेतला आहे.

कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या मदतीने लाभ मिळावा, यासाठी मुख्य सचिव विनी महाजन यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची उपलब्धता आणखी मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एल 2 आणि एल 3 बळकट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये एल 3 सुविधा उपलब्ध नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये सतत देखरेखीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, तज्ज्ञ, परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची आपत्कालीन नियुक्ती करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागांना दिले आहेत. 249 तज्ज्ञ डॉक्टर आणि 407 वैद्यकीय अधिकारी भरती होणार आहेत. भविष्यात आवश्यक असल्यास एमबीबीएसच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.
लस येत नाही, तोपर्यंत दिल्लीतील शाळा बंद.

कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत, तर काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्नदेखील केले गेले. मात्र, कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागेदेखील घेण्यात आला आहे. दिल्लीतील बहुतेक पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात असून, पुढील आदेश येईपर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहतील, अशी घोषणा सिसोदिया यांनी केली होती. आता सिसोदिया यांनी थेट जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे.