हायकोर्टाचा निर्णय ! नोकरी नसली तरीही पत्नीला पोटगी द्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पतीला नोकरी असो वा नसो, पतीला पत्नीला पोटगी द्यावीच लागेल असे निर्देश न्यायालयाने दिला आहे. नोकरी नसल्याने पत्नीला देण्यात येणाऱ्या पोटगीतून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, ती याचिका पंजाब न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की नोकरी नाही म्हणून पत्नीला पोटगी देऊ शकत नाही हे कारण असू शकत नाही.

६ हजार रुपये पोटगी –
हरियाणाच्या रोहतक मधील एका व्यक्तीने अशा स्वरुपाची याचिका पंजाब न्यायालयात दाखल केली होती. हे प्रकरण वैवाहिक संबंधाबाबतचे आहे. रोहतकच्या फॅमिली कोर्टात हा खटला सुरु आहे. या प्रकरणी न्यायालयाने पत्नीला दरमहा ६ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टांने पतीना दिले होते. परंतू आता त्या व्यक्तीची नोकरी गेली, नोकरी नसल्याचे सांगत आता या व्यक्तीने पोटगी देऊ शकत नाही अशी याचिका दाखल केली होती, परंतू उच्च न्यायालयाने ही याचिक फेटाळली आहे. तर फॅमिली कोर्टने दिलेले आदेश उच्च न्यायालयाने कायम ठेवण्यास सांगितले आहे.

पोटगी कायम –
न्यायालयाने याचिका फेटाळताना त्या व्यक्तीला सांगतिले की, तुम्ही सुशिक्षित आहेत, तुम्हाला आज ना उद्या नोकरी मिळेल. परंतू तुमच्या पत्नीजवळ उदारनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. पत्नीला तुमच्या लहान मुलीचा आणि घराचा खर्च देखील पाहायचा आहे. त्यामुळे पत्नीला पोटगी मिळणे गरजेचे आहे. याकारणाने पत्नीला मिळणारी पोटगी कायम ठेवावी.

या दरम्यान, पत्नीच्या वकिलांना पोटगी वाढवण्याची मागणी केली आहे. यावर कारण देताना त्यांच्याकडून सांगण्यात आले की, पोटगी म्हणून जी रक्कम मिळते ती सहा हजार रुपये आहे. ते घराचे भाडे देण्यास लागतात.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय

You might also like