…म्हणून बहिणीनं सख्ख्या भावासोबत केलं लग्न

पंजाब : वृत्तसंस्था –  एका तरूणीने आपल्या सख्ख्या भावासोबत लग्न केल्याची हैराण करणारी घटना पंजाबमधून समोर आली आहे. कारण तिला ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट व्हायचे होते. पण तिला व्हिसा मिळण्यास अडचण येत होती. त्यामुळे तिने सख्ख्या भावासोबत (Brother) लग्न केले आहे. याची तक्रार एका महिलेने पोलिसात दिल्यावर या घटनेचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात भाऊ-बहिणीचे घरवाले देखील सहभागी होते. भावासोबत बहिणीने लग्न केल्याची ही पहिलीच घटना ऐकली असून या घटनेने आम्ही देखील हैराण झाल्याचे पोलीसांनी सांगितले.

पोलीस अधिकारी जय सिंह म्हणाले की, संबधित तरूणीचा भाऊ  ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे. त्याच्या बहिणीला देखील ऑस्ट्रेलियाला जायचे होते. त्यासाठी तरुणीने  खोटी कागदपत्रे तयार करून आपल्या भावासोबत ऑस्ट्रेलियाला पळून गेली. तिचा भाऊ (Brother) ऑस्ट्रेलियात नोकरी करतो. पोलिसांनुसार, हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे. ज्यात संपूर्ण परिवाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. जय सिंह म्हणाले की, परदेशात जाण्यासाठी लोक अनेक प्रकारे फसवणूक करतात. मात्र, परदेशात जाण्यासाठी सख्ख्या भावासोबत लग्न केल्याची ही पहिलीच घटना ऐकली आहे.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

मुंबईत Lockdown मध्ये अंशत: शिथिलता; लोकल मात्र तुर्तास बंद राहणार