देशातील ३ मोठया बँकांकडून ग्राहकांना ‘बंपर’ गिफ्ट, आता प्रत्येक महिन्यात ‘बचत’च ‘बचत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील मोठी सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेनंतर आता बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या दरात कपात करून स्वस्त EMI ची भेट दिली आहे. म्हणजेच MSLR मध्ये कपात करण्यात आली आहे. याशिवाय तुम्ही जर होम, ऑटो किंवा पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही या दोन बँकेचे ग्राहक असाल तर कमी झालेल्या दराचा तुम्हाला फायदा होईल. बँकेने MSLR मध्ये कपात किंवा वाढ केल्यास बँकेच्या नवीन ग्राहकांसोबतच एप्रिल २०१६ नंतर ज्या ग्राहकांनी लोन घेतले आहे, त्या ग्राहकांवर याचा परिणाम होईल. १ एप्रिल २०१६ पासून बँकिंग व्यवस्थेत MCLR लागू करण्यात आला आहे आणि हाच लोनसाठी कमीतकमी दर असेल. यानंतर MCLR च्या आधारावरच लोन देण्यात येईल.

पंजाब नॅशनल बॅंक –

पंजाब नॅशनल बँकेने RBI कडून रेपो दरात कपात केल्यानंतर पहिल्यान्दाच कर्जदारमध्ये कपात केली आहे. PNB ने विविध कालावधीसाठी MCLR मध्ये ०.०५% कपात केली आहे. यानंतर PNB मध्ये १ वर्षासाठी MCLR ८.४०% झाला आहे.

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया-

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया ने सुद्धा विविध कालावधीसाठी MCLR मध्ये ०.०५% कपात केली आहे. यानंतर बँकेचा १ वर्षाचा कालावधीचा MCLR ८.५०% झाला आहे.

CICI बँक –

ICICI बँकेने सर्व कालावधीतील कर्जावर MCLR मध्ये ०.१ % कपात केली आहे. नवीन दर लवकरच लागू करण्यात येतील. १ वर्षाच्या कालावधीतील कर्जासाठीचा MCLR कमी होऊन ८.६५% इतका झाला आहे.

MSLR म्हणजे काय?

‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फण्डिंग बेस्ड लेंडिंग रेट’ अर्थात ‘एमसीएलआर’ बँकांनी जून २०१६पासून अनुसरण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नेटवर्थवर मिळणारा परतावा आणि कर्जावर येणारा खर्च विचारात घेतला जातो. कर्जदारांना योग्य दरात कर्जे मिळावीत यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘एमसीएलआर’नुसार कर्जदर ठरवण्यास सर्व बँकांना सांगितले आहे.

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

आधी एक भुमिका आणि खासदार झाल्यावर एक, इम्तियाज जलीलजी, हे वागणंं बरंं न्हवं !