सुवर्णसंधी ! स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करा, कारण PNB विकतेय 6435 घरं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) ग्राहकांसाठी स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. जर तुम्हीही यावर्षी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. कारण PNB ने आज (ता.15) रेसिडेन्सशिअल आणि कमर्शिअल प्रॉपर्टी लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

PNB कडून ट्विट करून याबाबतची माहिती दिली गेली आहे. ‘इंडियन बँक्स ऑक्शन्स् मॉर्टगेज्ड् प्रॉपर्टीज् इन्फॉर्मेशन’ने (IBAPI) याबाबत माहिती दिली. बँकेने 6435 रेसिडेन्शिअल, 1765 कमर्शियल, 964 इंडस्ट्रिअल, 19 ऍग्रिकल्चर प्रॉपर्टीचा लिलाव केला जात आहे. हा सर्व लिलाव बँकांकडून केला जाणार आहे. तसेच जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्हाला 25 फेब्रुवारी, 2021 ला PNB ई-लिलावात भाग घेऊ शकता. या लिलावात रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रीअल, ऍग्रिकल्चर प्रॉपर्टीही खरेदी करू शकता.

वेळोवेळी करतात लिलाव
जेव्हा कर्जदार कर्जाची थकीत रक्कम भरत नाहीत तेव्हा बँकांकडून त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. ही प्रॉपर्टी विकून बँकांकडून त्यांचे थकीत कर्ज वसूल केले जाते. दरम्यान, या लिलावाबाबत अधिक माहिती हवी असल्यास ग्राहकांनी बँकेत जाऊन याबाबतची माहिती घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.