नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विविध कारणासाठी कोणत्याना कोणत्या बँकेत खात असतं त्या बँकेच्या नियमुनासार खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवल्यानंतर खातेदारास अनके सुविधा दिल्या जातात. त्या घेत असताना आपण त्या बँकेचे खातेदार असणं गरजेचे असते. परुंतु पंजाब नॅशनल बँक यास अपवाद ठरत आहे. आपले खातेदार नसनाऱ्यानां सुद्धा या बँकेमार्फत एटीएम सुविधा दिली जाणार आहे. हे एटीम प्रीपेड कार्ड सारखं काम कारणार आहे. म्हणजे त्यात अगदोर पैसे भरावे लागणार आहेत. जसे की आपण मोबाईल मध्ये बॅलन्स टाकतो त्या पद्धतीत.
आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्या कार्डमध्ये पैसे भरू शकतो. त्यासाठी बँके ने खास सुविधा उपलध करून दिली आहे. इंटरनेट बँकिंग द्वारा या कार्डवर पैसे भरू शकतो व हे कार्ड कोठेही वापरता येते. या कार्डची वैधता कालावधी ३ वर्ष असून त्यात ५०० रुपयांपासून ५०,००० रुपयांपर्यंत व्यवहार करता येतात.
मात्र, इतर खात्याप्रमाणेच या ATM कार्डसाठी केवायसी पूर्तता करणे आवश्यक आहे. पंजाब नॅशनल बँकेने या ATM कार्डास सुविधा कार्ड असे नाव दिले आहे. आगामी काळात ही सुविधा किती लोकप्रिय होते ते कार्डच्या मार्फत आणि बँके मार्फत दिली जाणारी सेवा यावर अवलबून आहे.