आंब्याच्या झाडातून धूर येत असल्याचा दावा, ’चमत्कार’ पाहण्यासाठी उसळली गर्दी

पठाणकोट : पोलीसनामा ऑनलाइन –  पंजाबच्या पठाणकोटमधून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे एका ऐतिहासिक मंदिराजवळ एका आंब्याच्या झाडातून आपोआप धूर निघू लागला. ज्यानंतर हा चमत्कार पाहण्यासाठी येथे भाविकांची गर्दी उसळली आहे. मंदिराचा पुजारी हा निसर्गाचा चमत्कार असल्याचे म्हणत आहे. तर, वन विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, या पुरातन जंगलाच्या मातीचे परीक्षण करण्यात येईल, यानंतर समजेल की, झाडातून धूर का येत आहे?

हा प्रकार पठानकोटच्या हल्का भोयाच्या कटारु चक गावातील आहे. येथे चटपट बनी मंदिर असून येथे गुरूवारी भाविकांची गर्दी असते. चटपट बनी मंदिर एक ऐतिहासिक मंदिर आहे. येथे दूर-दूरहून लोक नवस करण्यासाठी येतात. येथे हजारो वर्षांपूर्वी एक नाथ तपस्या करत होते, तेव्हा एका शेतकर्‍याने त्यांच्यावर नांगर फिरवला आणि त्यांना जमीनीत दाबून टाकले.

असे म्हटले जाते की, जेव्हा हा शेतकरी दुसर्‍या दिवशी येथे आला तेव्हा एका रात्रीत येथे दाट जंगल तयार झाले होते आणि ठिक-ठिकाणी पाण्याची कुंड तयार झाली होती. ज्यानंतर आजूबाजूच्या गावातील लोक हा चमत्कार पाहण्यासाठी येथे जमा झाले. यांनतर लोक येथे नवस बोलू लागले, जेव्हा लोकांचा नवस पूर्ण होऊ लागला तेव्हा येथे एक भव्य मंदिर बांधण्यात आले आणि लोक दूरहून येथे दर्शनासाठी येऊ लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक जंगलात भगवान शंकरांचे मंदिर आहे. जंगलातील झाडे पंजाब किंवा हिमाचलच्या जंगलात कमी दिसून येतात. जंगलातील कोणत्याही झाडाचे लाकूड घरगुती वापरासाठी तोडणे अशुभ मानले जाते. येथे शिवरात्रीला एक मोठी जत्रा भरते. लोकांचे म्हणणे आहे की, येथे 1600-1700 वर्षांपूर्वी आपोआप तयार झालेल्या जंगलाचा नैसर्गिक चमत्कार दिसून आला होता. आता येथे आणखी एक चमत्कार पहायला मिळाला आहे.

जंगलातील एका आंब्याच्या झाडातून आपोआप धूर येत आहे. भाविकसुद्धा यास दैवी चमत्कार समजत आहेत. एका भाविकाने सांगितले की, झाडातून धूर येण्याचा चमत्कार मागील काही दिवसांपासून सतत सुरू आहे. तर एका व्यक्तीने सांगितल की, तो काही दिवसापूर्वी आंबे काढण्यासाठी झाडावर चढला असता त्याला हा चमत्कार दिसला, ज्यानंतर त्याने मंदिराच्या पुजार्‍याला सांगितले.

मंदिरातील पुजार्‍याने सुद्धा यास निसर्गाचा चमत्कार म्हटले आहे. पुजारी म्हणाला, हे ऐतिहासिक मंदिर असून येथे सतत काही ना काही चमत्कार होतच असतात. या परिसरातील कुणीही या जंगलातील लाकूड घरात जाळत नाही, कारण यामुळे मोठे नुकसान होते. यासाठी जंगलातील लाकूड केवळ मंदिरात धुनी पेटवण्यासाठी उपयोगात येते. जंगलातील हे लाकूड विभूती बनते आणि लोकांना प्रसाद म्हणून विभूती दिली जाते.

या संबंधी पठानकोटचे डीएफओ संजीव तिवारी यांनी म्हटले की, हे एक जुने जंगल आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारची वृक्ष आहेत. जर एखाद्या झाडतून धूर येत असेल तर या जंगलाच्या मातीचे परीक्षण करावे लागेल, ज्यानंतर एखाद्या निष्कर्षावर पोहचता येईल.