‘सिंघू बॉर्डर’वर एका आंदोलन करणार्‍या ‘शेतकऱ्याचा मृत्यू’, दिल्लीहून परत येणाऱ्या दोन शेतकऱ्यांनीही गमावले ‘प्राण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कृषी कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनामुळे आतापर्यंत अनेक शेतकर्‍यांनी आपले प्राण गमावले आहेत. सिंघू बॉर्डरवर निषेध करणार्‍या एका शेतकऱ्याचा मंगळवारी मृत्यू झाला. यापूर्वी सोमवारी पटियाला जिल्ह्यातील सफेद गावात सोमवारी रात्री एक रस्ता अपघात झाला होता, त्यात दिल्लीत धरणे आंदोलन करून परत येणाऱ्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेत अनेक शेतकरी जखमी देखील झाले आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाभ सिंह आणि गुरप्रीत सिंह अशी या दोन जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. गुरुप्रीत सिंह हे 23 वर्षांचे होते आणि ते घरात एकटेच कमावणारे होते. असे सांगितले जात आहे की शेतकरी धरणे आंदोलन देऊन ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून घरी परत येत होते, त्याचवेळी ते ट्रकला धडकले.

सिंघू बॉर्डरवर वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकऱ्यांचे आंदोलन हे तीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत. या दरम्यान, सिंघू बॉर्डरवर उषा टॉवरसमोर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याची ओळख गुरमीत निवासी मोहाली (वय 70 वर्षे) म्हणून झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच कुंडली पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत सोनीपतच्या सिंघू बॉर्डरवर चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गुरमीत यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हील हॉस्पिटल सोनीपत येथे पाठविला आहे. त्यासोबतच या प्रकरणाचा तपास देखील सुरू आहे.