2 युवकांकडून युवती ‘हैराण-परेशान’, Live व्हिडीओ ‘कॉलिंग’ करून घेतली ‘फाशी’, सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब मधील बरनाळा येथे राहणाऱ्या एका युवतीने मलेशियातील २ युवकांना कंटाळून लाईव्ह व्हिडीओ कॉलिंग वर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मनु राणीचा दोन्ही आरोपी बऱ्याच काळापासून छळ करीत होते, ज्यांची तक्रार प्रथम बरनाळा पोलिसात करण्यात आली होती, परंतु असा आरोप आहे की पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. ज्यामुळे एका निष्पाप मुलीने आपले आयुष्य संपवले आहे.

या प्रकरणी मृतक मनु चे वडील कुलविंदर सिंह यांनी सांगितलं की त्यांची मुलगी मनुचे वय २१ वर्ष होते. त्यांनी मागील वर्षीच मनुला मलेशिया ला पाठविले होते.

तसेच त्यांनी सांगितलं की आरोपींपैकी एक युवक त्यांच्या मुलीला नेहमी त्रास देत होता. त्याला कंटाळून त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलीस मागील वर्षी मलेशियाला पाठविले होते. परंतु आरोपी त्यांच्या मुलीला मलेशियात देखील त्रास द्यायला लागला ज्याची तक्रार त्यांनी बरनाळा पोलिसांत दिली परंतु आरोप आहे की त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही.

त्यांनी सांगितले की आरोपींनी मुलीचा छळ केल्याचे मुलीने आपल्या आईला सांगितले होते. तिने आरोपींची नावे देखील सांगितली होती. कुलविंदर सिंह यांचे म्हणणे आहे की ते दोघेही आपल्या मुलीच्या फोटोसोबत छेडछाड करून त्यास व्हायरल करण्याची धमकी देत होते.

या संदर्भात बरनाळाचे एसपी गुरदीप सिंह म्हणाले की, दोन आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांना लवकरच अटक केली जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like