‘या’ प्रसिध्द गायकाचं 2 एप्रिलला नवं गाणं होणार होतं प्रदर्शित, झाला रस्ते अपघातात मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पंजाबी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव गाडी रस्तादुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दिलजान जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. 30) पहाटे 3 च्या सुमारास अमृतसर-जालंधर जोटी रोडवर जंडियाला गुरू पुलाजवळ हा अपघात झाला. दिलजानच्या निधनाने पंजाबी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दिलजानचा मृतदेह ताब्यात घेतला. अपघात कसा झाला? त्याची गाडी दुभाजकाला कशी धडकली? याचा तपास पोलीस करत आहेत. गायक सुकशिंदर शिंदा यांनी दिलजानचे निधन झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. आज सकाळी अतिशय दु:खद बातमी कळाली. संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. दिलजानचे निधन झाल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.

2012 मध्ये दिलजान टीव्ही रिअ‍ॅलिटी शो सुरक्षेत्रचा रनअप ठरला होता. तसेच त्याने पिंड दी या कार्यक्रमात सहाभाग घेतला होता. या शोमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. त्याची गाणी कायमच चर्चेत होती. दिलजानने आजवर अनेक गाणी गायिली आहेत. त्याचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. लवकरच त्याचे एक नवे गाणे रिलीज होणार होते. या गाण्याचे नाव ‘तेरे वरगे 2 असे आहे. गाण्याबाबत दिलजान अतिशय उत्सुक होता. 2 एप्रिल रोजी त्याचे हे गाणे रिलीज होणार होते. पण त्यापूर्वीच त्याचे निधन झाले.