पुण्यतिथी : तलत महमूद यांनी केली होती परदेशात कॉन्सर्टची सुरुवात, मखमली आवाज आजही स्मरणात

पोलिसनामा ऑनलाइन –प्रसिद्ध गझल गायक तलत महमूद हिंदी सिनेमातील सर्वात वेगळ्या आवाजांपैकी एक आहे. गायिकीपासून तर अभिनयापर्यंत त्यांनी आपली छाप सोडली आहे. संगीताच्या करिअरची सुरुवात त्यांनी 1941 मध्ये केली होती. सब दिन एक समान नहीं होता हे त्यांचं पहिलं गीत होतं. सिनेमासाठी त्यांनी गायलेलं पहिलं गाणं जागो मुसाफिर जागो होतं. 1945 साली हे गाणं त्यांनी राजलक्ष्मी सिनेमासाठी रेकॉर्ड केलं होतं.

https://twitter.com/30Kumaar/status/1259098115174531072?s=20

प्रतिभेचं भंडार

अवघ्या 16 वर्षांचे असताना तलत महमूद ऑल इंडिया रेडिओचे गायक बनले होते. यानंतर सिनेमात नशीब आजमावण्यासाठी ते कोलकात्याला गेले. गायक अभिनेता म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. 13 वर्ष सिनेमात काम केल्यानंतर 1958 सालच्या जवळपास त्यांनी पूर्णपणे गाण्यावर लक्ष केंद्रीत केलं. उर्दूची उत्तम जाण असल्यानं सिनेमात गझलसाठी ते पहिली पसंत बनले.

परदेशात गायिकी

तलत महमूद पहिले भारतीय गायक होते ज्यांनी 1956 मध्ये परदेशात (पूर्व अफ्रिकेत) कॉन्सर्ट केली होती. याशिवाय लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉल, अमेरिकेतील मेडिसन स्क्वेअर गार्डन आणि वेस्टइंडिजच्या जीन पियरे कॉम्पलेक्स सारख्या प्रतिष्ठित ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले.

तलत महमूद यांची 5 सहाबहार गाणी

1) शुक्रिया शुक्रिया ऐ प्यार तेरा शुक्रिया- आराम सिनेमा(1951)

https://youtu.be/E3UMFSSGrvg

2) फिर वो ही शाम वो ही गम- जहां आरा सिनेमा (1964)

3) शाम ए गम की कसम- फुटपाथ सिनेमा(1953)

4) मैं दिल हूं एक अरमान भरा- अनहोनी सिनेमा(1952)

5) मेरा करार ले जा- आशियाना सिनेमा (1952)