कुत्र्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत वादंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या महासभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या चर्चेत दरम्यान राष्ट्रवादी-भाजप सदस्य एकमेकांमध्ये जोरदार भिडल्याची घटना बुधवारी (दि. १९) घडली. दोन सदस्यांचा वाद टोकाला गेल्याने अखेर २७ सप्टेंबर प्रयत्न सभा तहकूब करण्यात आली.
[amazon_link asins=’B005FYNT3G,B00DRLASZ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49202e5c-bbf4-11e8-b73f-5b70ae1ff0ca’]

कुत्र्यांच्या प्रश्नावरून चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते दत्ता साने व भाजपच्या सीमा सावळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर राहुल जाधव यांच्या आसनासमोर धाव घेतली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तणाव वाढतच चालल्याने अखेर महासभा दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आली.

महापालिका प्रशासनावर सत्ताधारी पक्षाचा वचक राहिला नाही, शहरातील मोकाट कुत्री पकडली जात नाहीत, जी पकडली जातात ती मोशी परिसरात सोडतात परत ती आजू बाजूच्या परिसरात येतात, याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी चक्क आज सभागृहात कुत्रे घेऊन येण्याचा प्रयत्न केला. मात्र विनंती नंतर प्रकार थांबला. यानंतर सभागृहात यावर जोरदार चर्चा झाली.
[amazon_link asins=’B0002E3MP4,B00C9Q5PGM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5cb0b9b2-bbf4-11e8-bdae-cbb6d3d23aa1′]

यावरून सभागृहात चांगलाच वादंग पेटला, त्यामुळे महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर  विरोधी पक्षनेते यांनी वापरलेला ९६ कुळी शब्द वगळून सभा तहकूब करण्याचा ठराव सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मांडला. त्यानंतर महापौर जाधव यांनी २७ तारखे प्रयत्न सभा तहकूब केली.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.