निवृत्त न्यायाधिशाच्या पुण्यातील फार्म हाऊसमधून कुत्र्याचे पिल्लू चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्ययालायतील निवृत्त न्यायाधिशाच्या फार्म हाऊसमधून जर्मन शेफर्ड जातीचा कुत्र्‍याचे पिल्लू चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फार्म हाऊसचा रखवालदार सिद्धेश्वर बंडू कांबळे (२६, कात्रज) याने यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द परिसरात निवृत्त न्यायाधिशाचे फार्म हाऊस आहे. ते मुंबईत वास्तव्यास असतात. त्यांचे कुटुंबिय आणि ते अधूनमधून पुण्यात येतात. मागील महिन्यात त्यांच्या फार्म हाऊसमधून अज्ञाताने तीन महिन्यांचे जर्मन शेफर्ड जातीचे कुत्र्‍याचे पिल्लू चोरन नेले. दोन दिवसांपुर्वी ते पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर त्याचा तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.