पुरंदर मध्ये अर्ज छाननीत 4 अर्ज बाद

जेजुरी :पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवसापर्यंत २४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते . शनिवारी ( दि . ५ ) उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या दिवशी यातील चार अर्ज बाद झाले. उमेश जगताप हे मनसेचे एबी फॉर्म आणलेले उमेदवार होते.

त्यांनी प्रतिज्ञापत्र अपुरे दिले होते. तसेच, गिरीश जगताप यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यांचा संबंधित एबी फार्म न आल्याने अर्ज बाद झाला. विजय शिवतारे यांचे चिरंजीव विनस शिवतारे यांचाही एबी फॉर्मच्या कारणाने अर्ज बाद झाला. गणपत दगडे यांचा भाजप म्हणून अर्ज बाद झाला, तरी अपक्ष म्हणून ते रिंगणात आहेत.

आता महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे, आघाडीचे संजय जगताप यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टी, संभाजी ब्रिगेड, लोक भारतीय पार्टी, बसप आदींसह १६ जण रिंगणात आहेत.

Visit : Policenama.com