Purandar Airport | पुरंदर विमानतळाच्या जागेवरुन अजित पवारांची ‘गुगली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airport) जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airport) जागेबाबत तांत्रिक अहवाल आलेला नाही. त्यामुळे विमानतळासाठी पुरंदरची जागा अजून निश्चित नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील अद्याप जागा निश्चित नसल्याचे सांगत गुगली टाकली आहे. त्यामुळे पुरंदर आणि खेड तालुक्यातील लोकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.

शरद पवार यांनी पुरंदरच्या विमानतळासाठी जागा अजून निश्चित केलेली नसल्याचे सांगत विमानतळासाठी आपल्याकडे तीन पर्याय आहेत. जनतेच्या मागणीनुसार खेड (Khed), चाकणच्या (Chakan) जागेचा विचार करावा. अजून विमानतळाची जागा निश्चित झाली नाही. शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. तीन जागांची पाहणी करुन माहिती जमा केली जात असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

 

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

कोरोना आढाव बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अद्याप पुरंदर विमानतळाबाबत जागा निश्चित नसल्याचे स्पष्ट केले. जागा अंतिम होईल तेव्हा सांगू असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पुरंदर विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने पुरंदर तालुक्यातील जागेसाठी विरोध केल्याने दोन्ही पवारांनी जागा निश्चितीबाबत अशी विधाने करुन गुगली टाकल्याची चर्चा आहे.

पुरंदर तालुक्यातील नवीन जागेचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी दिल्ली एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे (Delhi Airport Authority) पाठवण्यात आला आहे.
हा अहवाल आल्यानंतर विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार असल्याचे बहुतेक सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे खेड आणि पुरंदर तालुक्यातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Web Titel :- Purandar Airport | location international airport yet be decided after sharad pawar now ajits statement airport

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या