Purandar Airport | पुणेकरांचे स्वप्नभंग? संरक्षण मंत्रालयाकडून पुरंदर विमानतळाचा ‘साइट क्लिअरन्स’ रद्द?

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – Purandar Airport | पुणेकरांचे भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण संरक्षण मंत्रालयाकडून (Ministry of Defense) नियोजित पुरंदर विमानतळाचा (Purandar Airport) साइट क्लिअरन्स (Site Clearance) रद्द केली गेली असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, नियोजित विमानतळासाठी अजून देखील पुणेकरांना (Punekar) प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

 

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (International Airport) साइट क्लिअरन्स संरक्षण मंत्रालयाकडून रद्द केल्याचे दिसते, याचा अर्थ प्रकल्प देखील मृत झाला आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) पुण्यातील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी ही विनंती.’ असं ट्विट मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योग आणि कृषी अध्यक्ष सुधीर मेहता (Sudhir Mehta) यांनी केलं आहे. (Purandar Airport)

 

नुकतंच राज्य सरकारने (Maharashtra Government) पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील दोन हजार 832 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती.
केंद्र आणि राज्य सरकार तसेच एअरपोर्ट ॲथॉरिटी, संरक्षण मंत्रालयासह सर्व परवानग्या या जागेसाठी मिळाल्या आहेत.
परंतु, या 7 गावातील गावकऱ्यांनी आणि स्थानिक आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी विमानतळास विरोध दर्शविला होता.
त्यात आता संरक्षण मंत्रालयाने साइट क्लिअरन्स रद्द केले आहे.
यामुळे विमानतळाच्या भवितव्यासंदर्भात सवाल उपस्थित होत आहेत.

 

Web Title :-  Purandar Airport Ministry of Defence Cancels Site Clearance For Pune International Airport In Purandar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा