पुरंदरला 60 वर्षीय नराधमाकडुन 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन ( संदीप झगडे) – दिनांक 30/11/19 रोजी सकाळी 08:00 वा ते 10:30 वा चे दरम्यान मौजे खानवडी, ता. पुरंदर,  जि. पुणे येथील बक-यांचे वाड्याजवळ वाळुंज चौफुलाचे बस स्टॉप जवळील नाना दोडके (वय अंदाजे 60 वर्षे) हा पत्र्याचे शेड मध्ये राहत असलेल्या इसमाने माझी मुलगी वय 4 वर्षे ही त्याच्याकडे दुकानात खायला आणायला गेली असता, त्याने तिला घरात (शेड) नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नंतर तिला आंघोळ घालून आमचे घरी आणून सोडले होते.

तो त्यादिवशी त्याने तिच्या वर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याने तिचे पाय दुखत असल्याचे उशीराने तिने आम्हाला सांगितल्याने आमचेकडून वरीलप्रमाणे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

वरील गुन्ह्याची नोंद सासवड पोलिस स्टेशन मध्ये झाली असून याची तपासणी सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे  हे करत आहेत. सदर आरोपीला ताब्यात घेऊन आरोपी वर भादवि कलम 376, 511, पोस्को 2012 चे कलम 8,10,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : policenama.com