राष्ट्रीय तायक्वांदो कराटे स्पर्धेत पुरंदरच्या दुर्वाने पटकावले सुवर्णपदक

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – पुणे येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो कराटे स्पर्धेत सासवड ( ता. पुरंदर ) येथील दुर्वा सचिन तांदळे या विद्यार्थिनीने २१ ते २३ वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्याच प्रमाणे कराटेच्याच फुमसे या प्रकारात १२ वर्षाखालील वयोगटात तिने ब्रांझ पदक प्राप्त केले आहे. या बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विशेष म्हणजे मागील वर्षी कराटेच्या फाईट प्रकारात तिने सुवर्ण पदक मिळविले असून फुमसे प्रकारात सिल्व्हर पदक प्राप्त केले होते. यामुळे जुलै २०१९ मध्ये कोरिया येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्याच प्रमाणे नाशिक येथील राज्यस्तरीय अब्याकास स्पर्धेत ज्युनिअर गटात तिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

दुर्वा तांदळे हि विद्यार्थिनी खळद येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल मध्ये इयता ४ थी मध्ये शिक्षण घेत असून श्री लक्ष तायक्वांदो एक्याडमी चे कराटे प्रशिक्षक किरण गायकवाड आणि माधुरी गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळत आहे. दुर्वाची आई सोनाली तांदळे आणि वडील सचिन तांदळे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –