जेजुरी व परिसरात आढळले 13 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, पुरंदरमध्ये बाधित रुग्णांची संख्या 186

जेजुरी (संदीप झगडे) :  पोलीसनामा ऑनलाइन –  जेजुरी कोव्हिड सेंटर मधून काल 60 जणांचे स्वब तपासणी साठी पाठविण्यात आले होते . या पैकी आज सायंकाळी जेजुरी व परिसरातील 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत . या 13 पैकी 8 जण जेजुरी येथील हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील आहेत तर 5 जण ग्रामीण भागातील आहेत.

आज दुपारी सासवड कोव्हिड सेंटर मधील 21 पैकी 6 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. जेजुरी येथील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हि 12 झाली आहे तर पुरंदर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हि 186 झाली आहे.तर 54 हुन अधिक जण कोरोना मुक्त झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like