पुरंदर तालुक्यातील ५० गावांचा होणार ‘ड्रोन’द्वारे सर्व्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भूमी अभिलेख विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील ३९८६५ गावांचे ड्रोनच्या सहाय्याने गावठाण नगर भूमापन करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र राज्याचे जमाबंदी आयुक्त श्री. एस. चोखलिंघम यांचे मार्गदर्शनाखाली हाती घेतलेला आहे. या कामी मागील वर्षी पुरंदर तालुक्यातील सोनोरी या गावचा ड्रोन द्वारे प्रायोगिक तत्त्वावर भूमापन सर्व्हे यशस्वी रित्या पार पाडण्यात आल्यानंतर, आता त्याच धरतीवर संपूर्ण महाराष्ट्रातील गावांच्या गावठाणांचा सर्व्हे करण्यात येणार आहे.

‘सर्व्हे ऑफ इंडिया’ ग्रामविकास विभाग व भूमी अभिलेख विभाग संयुक्तरित्या हा प्रकल्प राबविणार आहेत. याची सुरुवात पुरंदर तालुक्यातील टेकवडी या गावापासून झाली असून या गावचे दिनांक १२ जुलै रोजी गावठाणातील मिळकतीचे सिमांकन करण्यात आले परंतु या दिवशी खराब हवामानामुळे ड्रोन उड्डाण होऊ शकले नाही. दिनांक १३ जुलै रोजी टेकवडी गावचा सकाळी ९ वाजता ड्रोन द्वारे यशस्वीरीत्या सर्व्हे करण्यात आला आहे.

यावेळी भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक श्री. तवरेज, हट्टेकर तसेच पुरंदर भूमी अभिलेख कार्यालयाचे रमेश पिसे, नितीन वाडकर, एस. एस. ताथवडकर, एस. पी. भांगरे, एस. व्ही. लवटे, बनकर, चेतन घोडे, बी. आर. गायकवाड, एस. डी. बाजारी, एस. एच. शेख, नवले, एस. एम. चिमटे आदी कर्मचारी हजर होते. टेकवडी गावचे ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील एकूण ५० गावांचे भूमापन करण्यात येणार आहे. या कामी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या