पुरंदर तालुक्यातील शिक्षकांचा जुन्या पेन्शनसाठी संप

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना व इतर काही मागणीसाठी सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवून संप यशस्वी केला. या संपास शिक्षक, आरोग्य, प्रशासन आदी विभागातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला. संपामुळे पुरंदर तालुक्यातील सर्व शाळा बंद राहिल्या. ही मागणी मान्य न झाल्यास दीर्घकालीन संप करण्याचा सर्व संघटनांचा विचार आहे.

यावेळी तालुक्यातील सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने प्रथम गटविकास अधिकारी पुरंदर यांना निवेदन दिले. यानंतर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला व तहसीलदार पुरंदर यांना निवेदन देण्यात आले.

जुनी पेन्शन हक्क संघटना, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समिती, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ, पुरंदर तालुका पदवीधर संघटना, पुरंदर तालुका केंद्रप्रमुख संघटना व इतर विभागातील सर्व संघटना या संपामध्ये सहभागी झाल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त –