पुरंदर मध्ये गुंजवणीचे पाणी येणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर तालुक्याला येणारे गुंजवणी चे पाणी आता कोणीच रोखू शकणार नाही. गुंजवणी प्रकल्पाच्या आराखड्यापासून ते जलवाहिनीच्या ‘ वर्क ऑर्डर ‘ पर्यंत अनेक संकटांवर मात करत विजय शिवतारे यांनी हा प्रकल्प मार्गी लावला . या प्रकल्पाचे शिवतारे खरे शिलेदार आहेत. विरोधकांनी मोठी कोर्टबाजी केली परंतु तेथेही शिवतारे पुरून उरले असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .


पुरंदर – हवेली मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ सासवड येथील पालखी तळावर झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते . यावेळी माजी आमदार संभाजी कुंजीर , जालिंदर कामठे , पंडित मोडक , दिलीप यादव , सचिन लंबाते , गिरीश जगताप , शंकर हरपळे , अजित जाधव , संकेत जगताप आदींनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी आमदार प्रसाद लाड , बाबा जाधवराव , संगीता राजे निंबाळकर , राहुल शेवाळे , रमेश जाधव , दत्ता काळे , विष्णू भोसले पंढरीनाथ जाधव , मंदार गिरमे, अभिजित जगताप यांसह पुरंदर हवेलीतील शिवसेना , भाजपा , रिपाई महायुतीचे कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते . अतुल म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी