पुरंदरमध्ये राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या वतीने फेसशिल्डचे वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – (संदीप झगडे) : महाराष्ट्राच्या कानाकोप-यात कोरोना विरूद्ध लढणा-या डाॅक्टरांबद्दल फेसशिल्ड देऊन कृतज्ञता मानण्याची करण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली, त्यानुसार राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्याचे अध्यक्ष डाॅ. नरेंद्र काळे यांच्या पुढाकारातून राज्यातील एक लाखांवर डॉक्टरांना फेस शिल्डचे वाटप सुरु करण्यात आले आहे.

असे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ रामदास कुटे यांनी सांगितले. राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने पुरंदर तालुक्यातील डाॅकटरांना फेसशिल्ड वाटप करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गावातील सुमारे 300 डॉक्टरांना हे फेसशिल्ड देण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यात फेसशिल्ड वाटप करताना डॉ अमोल हेन्द्रे, डॉ संजय रावळ, डॉ दिलीप वाघोळीकर, डॉ विनायक बांदेकर, डॉ भास्कर आत्राम, डॉ लक्ष्मण वांढेकर, डॉ संध्या खळदकर, आदी उपस्थित होते.

महापुर, दुष्काळ, रोगराई व कोरोनाच्या संकटकाळी समाजहितासाठी झोकून देऊन काम करणारी टिम उभी करणारे डॉ नरेंद्र काळे आणि त्यासाठी सदैव प्रेरणा देणारे पवार साहेब यांचे महाराष्ट्राचे वैदयकीय क्षेत्र ॠणी राहील असे डॉ रामदास कुटे यांनी सांगितले.