पुरंदर तालुक्याचा निकाल ९८.४६% ; ६५ पैकी ४९ विद्यालयांचा निकाल १००%

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – २०२० मध्ये झालेल्या माध्यमिक शाळांत परीक्षा ( इयत्ता १० वी ) चा निकाल बुधवारी ( दि २९ ) ऑनलाईन जाहीर झाला असून पुरंदर तालुक्यातील ६५ माध्यमिक विद्यालयांपैकी तब्बल ४९ विद्यालयांनी १०० टक्के निकाल नवीन अभिनंदनीय यश प्राप्त केले आहे. तालुक्याचा शेकडा निकाल ९८.४६ टक्के लागला असून एकूण २९३९ विद्यार्थ्यांपैकी पैकी २८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १२५९ विद्यार्थी विशेष प्राविण्य, १०९२ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर ४६४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

तालुक्यातील प्रथम पाच क्रमांकांचे विद्यार्थी, शाळेचे नाव आणि शेकडा गुण पुढीलप्रमाणे :-

प्रथम – ऋतुजा प्रकाश जगताप (९७.८०% ) म ए सो वाघिरे विद्यालय सासवड,
द्वितीय – सई सदानंद बडदे (९७.६०% ) म ए सो वाघिरे विद्यालय सासवड,
द्वितीय – निर्जरा नितीनकुमार पवार (९७. ६०% ) महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे,
तृतीय – साक्षी नितीन पुरंदरे (९७.४०% ) म ए सो वाघिरे विद्यालय सासवड,
चतुर्थ – राजगौरी विठ्ठल गायकवाड (९७% ) म ए सो वाघिरे विद्यालय सासवड,
चतुर्थ – महेक फिरोज पठाण ( ९७% ) जिजामाता हायस्कुल जेजुरी.

१०० % निकाल मिळविलेल्या ४९ विद्यालयांची नावे पुढीलप्रमाणे :-

वाघिरे विद्यालय सासवड, कर्मवीर विद्यालय परिंचे, जिजामाता हायस्कूल जेजुरी, शिवाजी इंग्लिश मेडियम स्कूल सासवड, गुरुकुल हायस्कूल सासवड, हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी, पंचक्रोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय वाघापूर, शंकरराव ढोणे विद्यालय गराडे, शिवाजी विद्यामंदिर आंबळे, कृषी औद्योगिक विद्यालय चांबळी, डॉ शंकरराव कोलते विद्यालय पिसर्वे, पारेश्वर विद्यालय पारगाव, ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळुंचे, न्यू इंग्लिश स्कूल पांगारे, यशवंत विद्यालय मावडी कप, न्यू इंग्लिश स्कूल मांडकी, भुलेश्वर विद्यालय माळशिरस, श्री सिद्धेश्वर विद्यालय नायगाव, महर्षी वाल्मिक विद्यालय कोळविहीरे, विद्या महामंडळ प्रशाला कोथळे, शिवशंभो विद्यालय एखतपूर – मुंजवडी, माध्यमिक विद्यालय मांढर, केदारेश्वर विद्यालय काळदरी, नागेश्वर विद्यालय नाझरे, डॉ पतंगराव कदम विद्यालय दौंडज, माध्यमिक विद्यालय यादववाडी, श्री कानिफनाथ विद्यालय भिवरी, श्री भैरवनाथ विद्यालय वनपुरी, मातोश्री जिजाई सोपानराव जाधव हायस्कूल साकुर्डे, मावडी पिंपरी हायस्कूल पिंपरे, हरणी माध्यमिक विद्यालय हरणी, आदर्श माध्यमिक विद्यालय केतकावळे, न्यू इंग्लिश स्कूल पिंपळे, न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन, न्यू इंग्लिश स्कूल गुरोळी, शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळद, सद्गुरू श्री नारायण महाराज विद्यालय नारायणपूर, राजे शिवराय विद्यालय पानवडी, श्री बी एस काकडे विद्यालय पिंपरे खुर्द, गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय हिवरे, वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय पिंगोरी, राजुरी माध्यमिक विद्यालय राजुरी, श्री सद्गुरू कानिफनाथ माध्यमिक विद्यालय बोपगाव, पुरंदर पब्लिक स्कूल जेजुरी, गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल, निवासी शाळा दिवे, जिजामाता इंग्लिश मेडियम स्कूल जेजुरी, शारदा इंग्लिश मेडियम स्कूल वाघापूर, इंदू इंग्लिश स्कूल कोळविहीरे, श्रीनाथ एजुकेशन सोसायटी इंग्लिश मेडियम स्कूल वीर.

शिक्षण महर्षी चंदूकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरंदर, हवेली व सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील १८ पैकी १७ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. संस्थेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची नावे अनुक्रमे पुढील प्रमाणे :- महेक पठाण ( ९७ टक्के ) जिजामाता हायस्कुल जेजुरी, साक्षी शेलार ( ९६ . ४० % ), पायल शिंदे (९६ . ४०%) आणि सर्वेश शेंडकर (९६.४०%) शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कुल सासवड. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे आमदार संजय जगताप, श्री शिवाजी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, विजय कोलते, संजय जाळींद्रे, दत्तात्रय गवळी, कानिफनाथ आमराळे यांसह विविध गावांतील संस्था, विद्यालयाचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक संघाचे प्राचार्य नंदकुमार सागर, भगवंत बेंद्रे, तानाजी झेंडे, कुंडलिक मेमाणे, वसंत ताकवले, सुधाकर जगदाळे, नितीन राऊत, इस्माईल सय्यद यांनी अभिनंदन केले आहे.