पुरंदर तालुक्याचा बारावीचा निकाल 93. 63 % चार विद्यालयाचा निकाल 100 %

जेजुरी (संदीप झगडे) : बारावीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्यात उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेची व निकालाची परंपरा राखणाऱ्या पुरंदर तालुक्याचा बारावीचा निकाल हा 93.63 टक्के लागला आहे. तालुक्यातून बारावीच्या परीक्षेसाठी 2798 विध्यार्थी बसले होते यापैकी 2662 विध्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

तालुक्यातील उच्चमाध्यमिक विद्यालयांचे बारावीची निकाल पुढील प्रमाणे रिसे पिसे ज्युनियर कॉलेज रिसे, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कुल सासवड, महात्मा फुले विद्यालय शिवरी व ली. र.शहा विद्यालय नीरा 100 टक्के निकाल, जिजामाता ज्युनियर कॉलेज जेजुरी 99.36 ,महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे 99.24,एसी हुंडेकरी कॉलेज जेजुरी 98 .36, किलाचंद विद्यालय नीरा 95.25, पंचक्रोशी विद्यालय वाघापूर 94.59,वाघिरे कॉलेज सासवड 93.85, केदारेश्वर विद्यालय काळदरी 93.54 , कर्मवीर विद्यालय परींचे 93.25, पिसर्वे ज्युनियर कॉलेज 90.41, पुरंदर हायस्कुल सासवड 89.59 एमईस वाघिरे विद्यालय सासवड 84.41 व हिवरे ज्युनियर कॉलेज 72.14 टक्के.

जेजुरी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जिजामाता विद्यालयाचा कला, वाणिज्य व विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के असून बँकिंग विभागाचा निकाल 96.42 टक्के लागला आहे विद्यालयाचा सरासरी निकाल 99.36 एवढा लागला आहे.अशी माहिती प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिली . पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्यध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर, तालुका मुख्याध्यपक संघाचे अध्यक्ष भगवंत बेंद्रे,शिक्षक संघाचे अध्यक्ष इस्माईल सययद ,शिक्षक नेते कुंडलिक मेमाणे,सुधाकर जगदाळे, रामदास शिंदे,वसंत ताकवले,दिलीप पापळ, तानाजी झेंडे,नितीन राऊत, अशोक साबळे , प्रा निलेश जगताप सोमनाथ उबाळे यांनी विद्यालयांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले