Purchase Of Cotton Seeds | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! कापूस बियाणे विक्रीवरील बंदी उठवली; ठाकरे सरकारचा निर्णय

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – Purchase Of Cotton Seeds | शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने 31 मे पर्यंत कापूस बियाणे विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, ती बंदी 1 जूनपासून उठवण्यात आली आहे. त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाणे खरेदी (Purchase Of Cotton Seeds) करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. याबाबत निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) घेतला आहे.

 

कापूस पिकाला मागील हंगामात चांगला दर मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल पुन्हा कापसाकडे दिसून येत आहे. बाजारात आता शेतकऱ्यांची कापूस बियाणे खरेदी (Purchase Of Cotton Seeds) करण्यासाठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. तसेच, बियाणे उत्पादक कंपन्यांनी केलेली दरवाढ शेतकऱ्यांनाच पीक हाती येण्याआधीच ते घाईला आले आहेत. त्याचबरोबर कापूस बियाण्याच्या किंमतीत झालेली वाढ कापसाच्या पिकापर्यंत देखील कायम राहणार का ? असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.

दरम्यान, खरीप हंगामात (Kharif Season) कापसाच्या बियाणाच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहे. दरम्यान, अकोला येथील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत (Akot Agricultural Produce Market Committee) कापसाला विक्रमी असा 14 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे या खरीपात कापसाचे क्षेत्र वाढणार आहे. कापसाच्या बियाण्याची मागणी पाहता यंदा कापसाच्या क्षेत्रात 12 ते 15 टक्के वाढ होणार असल्याची शक्यता कृषी व्यवसायिकांकडून (Agribusiness) वर्तवली आहे.

 

गेल्या वर्षी 767 रुपयांच्या बियाणाच्या पाकीटसाठी शेतकऱ्यांना आता 810 रुपये मोजावे लागणार आहेत.
याचा अर्थ प्रति पाकीट 43 रुपयांची वाढ झालीय. तसेच, गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 6 टक्क्याने बियाणे दरात वाढ झालीय.
म्हणून या हंगामापासूनच वाढीव किंमतीने शेतकऱ्यांना बियाणांची खरेदी करावी लागणार हे नक्कीच.
पण, बियाणे खरेदी केली असल्यास पेरणी योग्य करण्यासाठी पाऊस पडल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

 

Web Title :- Purchase Of Cotton Seeds | maharashtra government has good news for cotton farmers ban on purchase of cotton seeds lifted

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा