खडक माळेगाव द्राक्षमणी लिलाव आवारात भाजीपाला खरेदी सुरू करावी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  – खानगाव नजीक खडक माळेगाव द्राक्षमणी लिलाव आवारात मिरची,टॉमेटो व इतर भाजीपाला खरेदी सुरू करावी या मागणीचे निवेदन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांना खळक माळेगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले

निवेदनात म्हटले आहे की,खडक माळेगाव नजीक वनसगाव,शिवडी,थेटाळे,सोनवाडी,सारोळे रानवड,सावरगाव,देवगाव,दरसवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची,टॉमेटाचे क्षेत्र वाढलेले आहेत या भागात या शेतमालाच्या अधिकृत बाजार समितीचे खरेद विक्री केंद्राची ची सुविधा नसल्याने या गावामध्ये शिवार खरेदी करून मोठ्या प्रमाणत शेतकऱ्यांची यांची लुट केली जात आहे.त्यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत चालला आहे.

त्या अनुषंगाने लासलगाव बाजार समिती मार्फत या सर्व भागात केंद्र बिंदू असलेल्या खानगाव,खडक माळेगाव दाक्षमणी लिलाव आवारात टॉमेटो,मिरची व भाजीपाला याचा लिलाव सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच या ठिकाणी बाजार समितीचे अधिकृत खरेदी विक्री केंद्र सुरु झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांची सोय होऊन लुट भाव घेणाऱ्या शिवार खरेदी वरती नियंत्रण येईल आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल

या परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून लासलगाव बाजार समिती व प्रशासनाकडे खळक माळेगाव,खानगाव बाजार आवारावर मिरची,टॉमेटो व इतर भाजीपाला लिलावा चालू करण्याससाठी मागणी करत आहे,हि प्रक्रिया सुरू करण्यासाठी खड़क माळेगाव खानगाव ग्रुप ग्रामपंचायत व परिसरातील शेतकरी बाजार समितीला पाहिजे त्या मदतीसाठी वेळो वेळी तयार राहतील त्या दृष्टीकोनातून बाजार समितीने या मागणी बाबत योग्य निर्णय घेऊन बळीराजाला आधार द्यावा अशी मागणी येथील शेतकरी विकास रायते,वसंत शिंदे,गोकुळ शिंदे,राकेश रायते,नानासाहेब शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.