‘लॉकडाऊन’दरम्यान ‘फिटनेस फ्रिक’ मिलिंद सोमननं पत्नी अंकिता कुंवरला पाठीवर बसवून मारले ‘पुश-अप्स’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोनाच्या दहशतीमुळं पू्र्ण देशात 24 मार्च 2020 पासून 21 दिवसांसाठीचा लॉकडॉकऊन आहे. सामान्यांसोबतच सारेच बॉलिवूड कलाकार सध्या आपापल्या घरात कैद आहेत. अनेकजण आता आपापलं रूटीन बनवताना दिसत आहेत. फिटनेस फ्रिक आणि पुरुष सुपरमॉडेल अशी ओळख असणारा अभिनेता मिलिंद सोमन सध्या आपल्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आला आहे. त्यानं पत्नी अंकिता कुंवरला पाठीवर बसवलं आहे आणि तो पुशअप्स मारत आहे असं व्हिडीओत दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करताना मिलिंदनं लिहिलं की, “8 वा दिवस. तुमच्याकडे जे काही आहे त्याच्या मदतीनं कसरत करा. त्या सर्व लोकांसाठी ज्यांनी सांगितलं होतं की, त्यांच्याकडे कसरत करण्यासाठी काहीच सामान नाही. आता तुम्ही कोणतंही कारण देऊ शकत नाहीत. कोणतीही लस चांगल्या प्रतिकारशक्तीपेक्षा जास्त प्रभावी काम करत नाही. ही प्रणाली चांगली काम करावी यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. संपर्ण शरीर क्रिया चांगल्या बनवण्यासाठी सूर्य नमस्कार सारखा सोपा व्यायाम करावा. आपल्या कसरतीच्या पहिल्याच प्रयत्नात पत्नीला उचलण्याचा प्रयत्न करू नका. 5 ने सुरुवात झाली होती. आता ही संख्या 12 झाली आहे. धन्यवाद अंकिता.” या पोस्टमध्ये मिलिंदनं पत्नीलाही टॅग केलं आहे.

सध्या मिलिंद सोमनचा हा वर्कआऊट व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. मिलिंद सोमन एक फिट बॉलिवूड कलाकार आहे. त्यानं अनेक सिनेमात काम केलं आहे. बाजीराव मस्तानीमधीलही त्याची भूमिकाही साऱ्यांना आवडली होती. मिलिंद एक अॅथलिटही आहे. अनेक किमीची मोठी रनिंग तो करू शकतो.