Pushkar Shrotri – Santosh Juvekar | रेगे, मोरया सारख्या दमदार सिनेमांनंतर संतोष- पुष्कर पुन्हा दिसणार एकत्र

पोलीसनामा ऑनलाईन टीम – प्रेक्षकांना पुष्कर श्रोत्री आणि संतोष जुवेकर (Pushkar Shrotri – Santosh Juvekar) हि जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. रेगे (Rege), मोरया (Morya) सारख्या दमदार सिनेमांनंतर हे दोघे (Pushkar Shrotri – Santosh Juvekar) पुन्हा एकदा नव्या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. 36 गुण (36 Gun) या मराठी चित्रपटाच्या (Marathi Movies) माध्यमातून हि जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

या मराठी चित्रपटापटातील पुष्करच्या भूमिकेबद्दल बोलायचे झाले तर तो या सिनेमात एक वेगळी भूमिका साकारणार आहे. तो या चित्रपटात समुपदेशक म्हणजेच काऊन्सिलरची (Counsellor) भूमिका साकारणार आहे. मिस्टर गोडबोले असं पुष्करच्या व्यक्तिरेखेचं नावं असून तो मॅरेज काऊन्सिलर (Marriage Counsellor) आहे. अभिनेता संतोष जुवेकर आणि पुष्कर श्रोत्री या दोन अभिनेत्यांना या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र पाहायला मिळणार आहे.

’36 गुण’ चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. कोणत्याही नात्यामध्ये मनं जुळायला हवीत.
ती जुळली की, नात्याचा समतोल साधला जातो, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे असे पुष्कर श्रोत्री याने म्हंटले आहे.
त्यामुळे या दोन्ही अभिनेत्यांच्या चाहत्याना चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.
एक वेगळा विषय घेऊन येणार हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- marathi actor pushkar shrotri new film 36 gun with santosh juvekar

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा