Pushkar Singh Dhami | पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आजच घेणार शपथ

डेहराडून : वृत्तसंस्था – तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी उत्तराखंडच्या (Uttarakhand) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री (Uttarakhand New Chief Minister) कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्याची (Uttarakhand New Chief Minister) घोषणा झाली आहे. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री (Uttarakhand New Chief Minister) म्हणून पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) आज संध्याकाळी शपथ घेणार आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

यावर्षीच त्रिवेद्रसिंह रावत (Trivedra Singh Rawat) यांच्या जागी तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांची मुख्यमंत्रीपदावर (CM) नियुक्ती झाली होती. त्यांना या पदावर येऊन चार महिने देखील पूर्ण झाले नाहीत. तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी मोर्या (Governor Baby Morya) यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. पक्षनेतृत्वाने शुक्रवारी तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. पुढील वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Assembly elections) होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांचा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे.

कोण आहेत पुष्कर सिंह धामी ?

पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष (State President of BJP Youth Front) राहिले आहेत. तसेच ते आरएसएसचे (RSS) जवळचे मानले जातात. पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) हे उधमसिंह नगर जिल्ह्यातील (Udham Singh Nagar district) खटीमा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व (Khatima Assembly constituency) करतात. ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षातील तरुण आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळक आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Pushkar Singh Dhami | pushkar singh dhami as the next uttarakhand chief minister

हे देखील वाचा

7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे

New Liquor Licence | मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होण्याची शक्यता

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी

Modi Government । नोकरदारांसाठी खुशखबर ! आता सुट्ट्या वाढणार तर PF, पगारात होणार मोठा बदल; लवकरच मोदी सरकार निर्णय घेणार