15 कोटींचा ‘हा’ रेडा पाहून ‘थक्क’ झाले लोक, दररोज पितो 1 किलो ‘तुप’ अन् ‘बदाम’

नवी : दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या चर्चा आहे ती राजस्थानमधील पुष्करच्या सर्वात मोठ्या जनावरांच्या मेळ्याची (बाजाराची). यंदा या मेळ्यात आकर्षणाचा विषय आहे एक रेडा. या रेड्याचे नाव आहे भीम. या रेड्याची किंमत 15 कोटी सांगितली जात आहे. या रेड्याचे पिळदार शरीर 6 वर्षात कमावले आहे. या रेड्याच्या मालकाने जवाहर जहांगीर यांनी सांगितले की मुर्रा जातीच्या या रेड्याचे वजन जवळपास 1300 किलो आहे. त्यांच्या खाण्यापिण्यावर देखरेखीवर महिन्याला सव्वा लाख रुपये खर्च होतो.

रेड्याच्या मालकाने या रेड्याचे डायट देखील सांगितले. हा रेडा रोज जवळपास एक किलो तूप, अर्धा किलो बटर, मध, दूध आणि काजू बदाम एवढे खातो. रेड्याच्या खाण्यापिण्यावरच सव्वा लाखाच्या घरात खर्च होतो. याशिवाय 1 किलोग्रॅम सरसोच्या तेल्याने त्याची मालिश केली जाते.

ते म्हणाले की रेड्याच्या देखरेखीसाठी 4 लोक आहेत. भीमचे वय 6 वर्ष आहे आणि त्याचे शरीर या वयात दुसऱ्या रेड्यापेक्षा चांगले आहे. याची उंची जवळपास 6 फूट आहे तर लांबी 14 फूट आहे. या रेड्याचा वापर म्हशींच्या गर्भधारणेसाठी केला जातो, ज्यामुळे जास्त दुध देणारी म्हैस जन्माला येते, त्यामुळे या रेड्याची किंमत 15 कोटी रुपये लावण्यात आली आहे.

Visit : Policenama.com