बिहार निवडणूकीच्या मैदानात ‘पुष्पम प्रिया’ची ‘एंट्री’, जनसंपर्क अभियानास सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  या वर्षीच्या अखेरीस बिहार विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. दरभंगच्या राहणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी आपली जाहिरात करत स्वत:ला बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार सांगितले आहे. पुष्पम प्रिया यांनी मागील आठवड्यात ‘प्लूरल्स’ नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आणि स्वत:ला मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार असल्याचे घोषित केले. 

शनिवारी पुष्पम प्रिया यांनी जनसंपर्क अभियानास मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा गड मानल्या जाणाऱ्या नालंदापासून सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत लिहिले की, त्यांचा पक्ष असलेल्या ‘प्लूरल्स’ची योजना अत्यंत स्पष्ट आहे. आंतरराष्ट्रीय ज्ञान आणि अनुभव यांचा मिलाफ. जेणेकरुन, कृषि क्रांति, औद्योगिक क्रांति आणि नगरीय क्रांति याची नवी कथा लिहिली जाईल.

आपल्या जनसंपर्क अभियानादरम्यान पुष्पम प्रिया कृषि उद्यमी सुमंत कुमार यांच्या घरी गेल्या आणि त्यांना आपल्या पक्षाचे सदस्यत्व दिले. त्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिले, सुमंत कुमार यांच्यासारख्या कृषि उद्यमींना सोबत घेऊन बिहारच्या कृषि व्यवस्थेचा इतिहास आणि भूगोल बदलण्यासाठी प्रयत्न करेल. प्रिया या दरभंगाच्या राहणाऱ्या आहेत आणि त्यांनी त्यांचे शिक्षण लंडनमध्ये पूर्ण केले आहे. त्यांचे वडील विनोद चौधरी जेडीयूचे वरिष्ठ नेता आहेत आणि आमदार देखील होते.

मुख्यमंत्री होणार –

पुष्पम प्रिया चौधरी यांनी मागील आठवड्यात वृत्तपत्रात एक जाहिरात देऊन स्वत:च्या नव्या पक्षाची घोषणा केली होती आणि स्वत:ला मुख्यमंत्री पदासाठी दावेदार म्हणून घोषित केले होते. जेव्हा त्यांच्या वडीलांना याची माहिती मिळाली तेव्हा ते म्हणाले की प्रियाने चांगले पाऊल उचलले आहे आणि मी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करत आहे.