सौदीवरील ड्रोन हल्ल्यावरून पुतीन यांनी इराणला सोबत घेत अमेरिकेची ‘टर’ उडवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी ‘साऊदी आरामको’ वर झालेल्या ड्रोन हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. या तेल कंपनीवर झालेल्या हल्ल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि क्षेत्रीय स्थिरतेला चांगलेच नुकसान पोहचले आहे. त्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी सौदीला आपल्याकडून शस्त्रास्त्रे घेण्याचा प्रस्ताव देऊन अमेरिकेला आणखीनच डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

सौदी वरील हल्ल्यासाठी इराण जबाबदार 

तुर्कीची राजधानी अंकारा मध्ये व्लादिमिर पुतीन हे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन आणि इराणचे राष्ट्रपती हसन रोहानी यांच्यासोबत एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलत होते. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सौदी अरब वरील झालेल्या हल्ल्याला ईराणला जबाबदार ठरवले आहे. दुसऱ्या बाजूला तुर्की हा सौदी किंगडम चा सर्वात मोठा क्षेत्रीय शत्रू आहे. या तिन्ही देशांमध्ये रशिया आपल्या शस्त्रास्त्रांच्या मदतीने आपला प्रभाव मजबूत करत आहे.
सौदीने समझदारीने निर्णय घ्यावेत 
सौदी वर झालेल्या हल्ल्यावरून पुतीन यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले, आम्ही सौदी अरेबियाला मदत करण्यासाठी तयार आहोत परंतु त्यांना समझदारीने निर्णय घ्यावे लागतील. जसं इराणने आमच्याकडून एस-३०० खरेदी केले आणि तुर्की ने आधुनिक एस-४०० एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सिस्टम सौदी अरेबियाच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. पुतीन च्या बाजूलाच बसलेले इराण चे राष्ट्रपती हसन रोहानी यांनी पुतीन कडे पाहून स्मितहास्य केले.
पुतीन यांनी दिला कुराणचा संदर्भ 
इराण हा देश रशियाकडून एस-३०० मिसाईल ऑपरेट करत आहे. तसेच जुलै महिन्यात एस-४०० ला तुर्कीच्या पहिल्या बॅच कडे सोपवले गेले होते. तसेच यमन मध्ये सौदी वर झालेल्या हल्ल्यावरून टीका करताना पुतीन यांनी कुराण चा संदर्भ दिला. पुतीन म्हणाले , कुराण मध्ये केवळ आपल्या लोकांच्या रक्षणासाठी केली गेलेली हिंसा सोडून इतर सर्व प्रकारची हिंसा अमान्य आहे. इराण समर्थित यमनच्या हुती विद्रोहींनी सौदी वरील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सौदी अरबस्थित एका समुहाने २०१५ मध्ये यमन वर हल्ला केला होता. तेव्हापासून तेथील हुती विद्रोह्यांच्या विरोधात त्यांची लढाई सुरु आहे.

Visit : Policenama.com