‘सुवर्ण’कन्या सिंधू बनली ‘चॅम्पियन’ ! अखेर बदला घेतला, गतविजेत्या ओकुहाराला केलं पराभूत (व्हिडीओ)

World Badminton Championships 2019 : 21-7, 21-7 अशा 2 सरळ सेटमध्ये सिंधूनं मारली बाजी

स्वित्झर्लंड : वृत्तसंस्था – भारताच्या पी.व्ही सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदला गवसणी घातली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहीली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयाने सिंधूने २०१७ च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली आहे. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.

या सामन्यापूर्वी सिंधू आणि ओकुहारा यांच्यातील जय पराजयाची आकडेवारी ८-७ अशी भारतीय खेळाडूच्या बाजूने होती. सिंधूने पहिल्या गेमपासूनच आक्रमक खेळ करताना ओकुहाराला डोक वर काढू दिले नाही. तिच्या विजयाने प्रेक्षकांनी गणपती बाप्पा मोरया आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. सिंधूच्या आक्रमक खेळाने तिच्या पाठीराख्यांचाही उत्साह आणखी वाढवला.

सिंधूने नेट प्लसिंग आणि परतीच्या फटक्यांचा सुरेख खेल करताना अवघ्या १६ मिनिटांत पहिला गेम २१-७ असा नावावर केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग ८ गुणांची कमाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like