वर्ल्ड चॅम्पियनशीप : इतिहास घडवण्यापासून एक पाऊल दूर सिंधु, फायनलमध्ये ‘धडक’

पोलिसनामा ऑनलाईन :  वर्ल्ड चैम्पियनशिप : ऑलिम्पिक रोप्य पदक विजेती भारताची प्रसिद्ध बॅडमिंटन पट्टू पी.व्ही सिंधु हिने शनिवारी स्विट्जरलैंड मध्ये सुरु असलेल्या बीडब्ल्यूएफ बैडमिंटन वर्ल्ड चैम्पियनशिप-२०१९ च्या स्पर्धेत अंतिम सामन्यांमध्ये प्रवेश केला आहे. या विजयामुळे सिंधूचे या प्रतियोगितेतील रोप्य पदक आता निश्चित झाले आहे. आता सिंध इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल  दूर आहे.

बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१९ च्या अंतिम सामन्यात जर सिंधू ने बाजी मारली तर तिला सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्ण संधी असेल. विशेष म्हणजे,  महिला आणि पुरुष गटात आत्तापर्यंत वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आलेलं नाहीये.

जागतिक क्रमवारीत पाचव्या विराजमान असलेल्या सिंधू ने वर्ल्ड नंबर ३ असलेली चीनची चेन यू फेई हिला सरळ सेट मध्ये २१-७-, २१-१४ ने पराभूत केले. हा सामना तब्बल ४० मिनिटे चालला.
भारतीय खेळाडूने सामन्याची दमदार सुरुरवात करून पहिला गेम एकतर्फा जिंकला. सुरवातीपासून सिंधू चीनच्या प्रतिस्पर्धी वर वरचढ दिसून आली आणि ६-२  ने आघाडी मिळवली.

आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर सिंधू ने ब्रेक होईपर्यंत ११-३ ने आघाडी वर होती. वर्ष २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये रोप्य तथा २९१३ आणि २९१४ मध्ये कांस्य पदक जिंकलेल्या सिंधूने ब्रेक नंतर आपल्या खेळाचा स्तर कमी होऊ दिला नाही. तिने नेट वर शानदार खेळ केला आणि १८-५ ची आघाडी घेऊन नंतर २१-७ ने सामना जिंकला.

दुसऱ्या सेट मध्ये दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये चांगली टक्कर पाहायला मिळाली. एक वेळी स्कोर हा ३-३ ने बरोबरीत होता. परंतु भारतीय खेळाडूने लवकरच सूर पकडून ब्रेक पर्यंत ११-७ ने पुढे बाजी मारली. त्यानंतर सिंधू ने सामन्यात मागे वळून पहिले नाही. आणि  १५-८ ने आघाडी घेत अखेर २१-१४ ने सामना जिंकून अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. या विजयानंतर सिंधूचे रोप्य पदक निश्चित झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like