Advt.

PV Sindhu | ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू ‘या’ पदासाठी निवडणूक लढवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PV Sindhu | भारताला बॅडमिंटनमध्ये दोन ऑलिम्पिक पदके मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (PV Sindhu ) आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान बीडब्ल्यूएफ अ‍ॅथलिट कमिशनची (BWF Athlete Commission) निवडणूक लढवणार आहे. सध्याची विश्वविजेती असलेली सिंधू बालीमध्ये इंडोनेशिया ओपन सुपर 1000 टुर्नामेंटमध्ये (Indonesia Open Super 1000 Tournament) खेळत आहे. सिंधू सहा पदांसाठी नामांकन देण्यात आलेल्या नऊ खेळाडूंपैकी एक आहे. अ‍ॅथलिट आयोगाच्या कार्यकाळासाठीची निवडणूक 17 डिसेंबर रोजी टोटल एनर्जिक बीडब्ल्यूएफच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसोबत (BWFC World Championships) स्पेनमध्ये (Spain) होणार आहे.

 

पी.व्ही. सिंधूच (PV Sindhu) पुन्हा एकदा या निवडणुकीसाठी उभी राहिली आहे. तिने 2017 मध्ये हि निवडणूक लढवली होती. ती या कार्यकाळासाठी निवडलेल्या सहा महिला प्रतिनिधींपैकी एक आहे. सिंधूसोबत इंडोनेशियाची (Indonesia) महिला दुहेरीतील खेळाडू ग्रेसिया पॉलीसुद्धा (Gracia Polly) हि निवडणूक लढवणार आहे. ग्रेसिया पॉली हि टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) सुवर्णपदक विजेती आहे. पी.व्ही. सिंधूची मे महिन्यात आयओसीच्या बिलिव्ह इन स्पोर्ट्स अभियानासाठी अ‍ॅथलिट आयोगामध्ये (IOC’s Believe in Sports Campaign) निवड झाली होती.

पी. व्ही. सिंधूने (PV Sindhu) सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके (olympics medal ) जिंकून इतिहास रचला आहे.
सिंधूने रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
तर यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने कांस्यपदक जिंकले होते.
सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी एकमेव भारतीय महिला क्रीडापटू आहे.
यावेळी पी. व्ही. सिंधूला देशातील तिसरा सर्वोच्च सन्मान असलेला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आहे.
तसेच तिला खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

 

Web Title :- PV Sindhu | olympic medalist pv sindhu will contest elections and will contest for the post of BWF Athlete Commission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार ! सुरक्षा रक्षकानं बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या 36 वर्षीय महिलेचं केलं व्हिडीओ शुटिंग

ST Workers Strike | ‘एसटी आंदोलनात पडळकर, सदाभाऊ खोत तेल ओतण्याचे काम करतात’, शिवसेनेचा घणाघात

Pune Corporation | जैन इरिगेशन कंपनी ठरली महापालिकेला वरचढ ! रद्द केलेले चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम पुन्हा त्याच कंपनीला देण्याचा निर्णय

PM Kisan | खुशखबर ! 18 दिवसानंतर शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार 4000 रुपये, तपासून पहा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Anil Parab | अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई (व्हिडीओ)