पी.व्ही. सिंधूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठा

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचा फोर्ब्सच्या यादीत सर्वोत्तम १० खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे . २०१८ सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत सिंधूला पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळालं आहे. या यादीमध्ये सिंधू सातव्या स्थानावर आहे. अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने या यादीमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. सेरेनाने यंदाच्या वर्षात जाहिरातींच्या माध्यमातून १८.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. काल फोर्ब्सने ही यादी जाहीर केली.
[amazon_link asins=’B078N5MBL9,B00W6ZUMW8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cbae035f-a60b-11e8-a22a-6d025490b1f0′]

जाहिरातींच्या माध्यमातून सिंधूने यंदाच्या वर्षात अंदाजे ६० कोटी रुपये कमावले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या १० जणांमध्ये सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. काल फोर्ब्सने ही यादी जाहीर केली.