अभिनेता आयुष्मान आणि जितेंद्रनं कसा केला लिपलॉक ‘KISS’ ?, मेकिंग व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांच्या शुभमंगल ज्यादा सावधान सिनेमाच्या ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमात आयुष्मान आणि जितेंद्र यांचा लिपलॉक किसिंग सीन आहे जो चर्चेचा विष ठरत आहे. अनेकांना ट्रेलर पाहून प्रश्न पडला की आयुष्माननं हा सीन नेमका कसा दिला असेल. याचा खुलासा आता झाला आहे. गबरू साँग मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे ज्यात आयुष्मान आणि जितेंद्र यांचा किसिंग सीन कसा तयार करण्यात आला हे दिसत आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, बधाई हो फेम गजराव राव आणि नीना गुप्ता हेदेखील आपलं मत मांडत आहे. आयुष्माननंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयुष्मान म्हणतो, “एक अ‍ॅक्टर म्हणून तुम्हाला सर्वच गोष्टींसाठी प्रीपेर रहावं लागतं. तुम्हाला सर्वकाही करावं लागतं.”

मेकिंग व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आयुष्मान जितेंद्र आणि त्याच्या किससाठी त्याला प्रीपेर करताना त्याला म्हणतो की, हा किस असा करायचा की, कधी किस होऊन गेला कळालंही नाही पाहिजे. आयुष्मान आणि जितेंद्र अचानाकच भिडतात आणि एक लाँग लिपलॉक किस करतात.

You might also like