‘प्यार किया तो डरना क्या’ मधील ‘ही’ अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- आजवर अनेक बॉलिवूड कलाकार जे आपल्याला पाहायला मिळाले मात्र, नंतर ते कलाकार बॉलिवूडमधून गायब होतात आणि प्रेक्षकांना देखील त्यांचा विसर पडतो. अंजली जवेरी अशीच एक कलाकार आहे.

अंजली जवेरीला विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. विनोद यांचा मुलगा अक्षयला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी ते ‘हिमालय पुत्र’ हा चित्रपट बनवत होते. अक्षय सोबत या चित्रपटात एखादी नवीन नायिका असावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते एका फ्रेश चेहऱ्याच्या शोधात होते. त्याचवेळी अंजली जवेरी ही मुलगी त्यांना दिसली आणि त्यांनी अक्षयची नायिका म्हणून तिची निवड केली.हिमालय पुत्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही आणि त्यामुळे अक्षयला पुढील काही चित्रपटात साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारावी लागली.

पण ‘बॉर्डर’ या चित्रपटानंतर त्याच्या करियरला चांगलेच वळण मिळाले तर दुसरीकडे अंजली ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात अरबाज खानच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली. अंजलीची या चित्रपटातील भूमिका महत्त्वाची असली तरी तिला लोकप्रियता मिळाली नाही. त्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर गेली. अंजली प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता तरुण अरोराची पत्नी आहे. तरुणने जब वी मेट या चित्रपटात अंशुमनची भूमिका साकारली होती. दरम्यान, ती आता बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी दाक्षिणात्य चित्रपटात ती काम करताना दिसते. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली ओळख देखील निर्माण केली आहे.