बिबट्या आणि अजगराच्या झुंजीचा थरार (व्हिडिओ)

केनिया : वृत्तसंस्था – बिबट्या साधारणपणे हरीण, सांबर अशा जंगली प्राण्यांची शिकार करत असतो. मात्र एका बिबट्याने अजगराची शिकार करण्याचा प्रयत्न केला. अजगरानेही बिबट्याला झुंज देत त्याच्या भोवती विळखा घातला. मात्र या लढाईमध्ये बिबट्याची सरशी झाली. केनियामधील मसाई मारा अभयारण्यामध्ये अजगर आणि बिबट्याची झटापटीचा व्हिडिओ एका पर्यटकाने कैद केला आहे.

शिकारीच्या शोधात असणाऱ्या बिबट्याने अचानक अजगरावरच हल्ला केला. अजगरानेही बिबट्याला चांगलेच उत्तर देत त्याच्या भोवती विळखा घातला. बिबट्याने चपळाईने त्यामधून स्वत:ची सुटका करुन घेतली.

या घटनेविषयी माईक वॉल्टन या फोटोग्राफरने दिलेल्या माहितीनुसार, अजगराने बिबट्याला विळखा मारला. मात्र त्यामधून बिबट्याने सुटका करुन घेतली. बिबट्याने अजगराच्या तोंडाचा जोरात चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला असावा. कारण नंतर तो अजगर तडफडत होता. तो कदाचित मेलाही असेल. ही लढाई अंगावर काटा आणणारी होती.

 

Visit : Policenama.com