आगामी ३ वर्ष पाकिस्तानचे आर्मी चीफ बनुन राहणार कमर जावेद बाजवा, इम्रान खाननी कार्यकाल वाढवला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे आर्मी चीफ कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाल ३ वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यास मंजूरी दिली आहे. जनरल बाजवा हे पाकिस्तानचे १० वे आर्मी चीफ आहेत. २९ नोव्हेंबर २०१६ पासुन त्यांच्याकडे पाकिस्तानच्या आर्मी चीफचा चार्ज आहे.

भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानमधील परिस्थिती अत्यंत हालाख्याची असली तरी पाक सैन्य सीमेवर घुसखोरीच्या प्रयत्नात आहे. दोन दिवसांपुर्वी पाकच्या सैनिकांनी सीमारेषेवर अंदाधूंद गोळीबार केला. त्यामध्ये एक भारतीय जवान शहीद झाला. काश्मीर मुद्यावर विनाकारण कांगावा करत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा जागतिक स्तरावर नेऊन स्वतःचे हसू करून घेतले आहे.

दरम्यान, आज (सोमवार) पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे आर्मी चीफ म्हणून जनरल कमर जावेद बाजवा यांचा ३ वर्षांसाठी कार्यकाल वाढवला आहे.

आरोग्यविषयक वृत्त