‘सुलेमानी’च्या मृत्यूनंतर अमेरिकेनं सैन्य प्रमुख बाजवा यांना केला ‘संपर्क’, पाकची ‘सावध’ भूमिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकाने शुक्रवारी सकाळी बगदाद एअरपोर्टवर एअर स्ट्राइक करत इराणच्या कुद्स फोर्सचे मेजर जनरल सुलेमानी यांना मारले. त्यानंतर अमेरिकेकडून अनेक देशांची चर्चा सुरु झाली. अमेरिकाचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी पाकिस्तानचे सेना प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी संपर्क साधून सुलेमानी यांच्या विरोधात राबवण्यात आलेल्या ऑपरेशनसंबंधित स्थिती समोर मांडली.

अमेरिका संरक्षण विभाग पेंटागनकडून सांगण्यात आले की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिल्यानंतर बगदाद एअरपोर्टवर हल्ला करण्यात आला आणि सुलेमान यांना मारण्यात आले. अमेरिकेने सांगितले की सुलेमान इराण आणि इतर देशात अमेरिकी नागरिकांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न करत होते.

ट्विटरवर अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी माहिती दिली की, त्यांनी इराणी जनरलचे अमेरिकी ऑपरेशनमध्ये मारल्यानंतर पाकिस्तानचे सेना प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यासह जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हाइको मास, फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जिएन युवेस ले ड्रियान आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्याशी चर्चा केली.

पोम्पियो यांनी लिहिले की पाकिस्तानच्या मेजर जनरल बाजावा यांच्याबरोबर कासिम सुलेमानी यांना मारण्याच्या अमेरिकेच्या रक्षात्मक कारवाईसंबंधित चर्चा केली. ते म्हणाले की मध्य-पूर्व मध्ये इराणच्या गतिविधी क्षेत्राला अस्थिर करणारी आहे आणि आम्ही अमेरिकी नागरिक आणि आमच्या सहयोगीच्या सुरक्षेसाठी कटीबंध आहोत.

पाकिस्तान आर्मीची मिडिया विंग इंटर सर्विसेज पब्लिक रिलेशन्सने ट्विट करत याची माहिती दिली. ते म्हणाले की पाकिस्तान आणि अमेरिकेत मध्य पूर्व तणाव परिस्थितीवर चर्चा झाली.
पाकिस्तानी सेने प्रमुखांनी शांतता आणि स्थिरतेच्या व्यापक उद्देशांतर्गत क्षेत्रातील वाढणार तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक भूमिका निभावण्याचे आवाहन केले. पाकिस्तानी सेना प्रमुखांनी अफगान शांती प्रक्रियेवर लक्ष देण्याची आवश्यकता सांगितली.

पाकिस्तानने चिंता व्यक्त केली –
पाकचे परराष्ट्र मंत्र्यांनी सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. पाकिस्तानने या घटनेवर चिंता देखील व्यक्त केली. पाक कडून सांगण्यात आले की या घटनेने शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो.

परराष्ट्र धोरणांची पाक ने समीक्षा करावी –
पाकच्या संसदेत विरोधी पक्षांकडून मागणी केली गेली की परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशींनी खासदारांना मध्य पूर्व तणावपूर्ण स्थितीवर पाकिस्तानचा पक्ष स्पष्ट करावा. माजी खासदार रजा रब्बानी म्हणाले की अमेरिकेने सुलेमानी यांची हत्ताय करुन क्षेत्रात एक नवा तणाव निर्माण केला आहे. ते म्हणाले की अमेरिका – इराणच्या खराब संबंधांमुळे पाकच्या अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होईल. परराष्ट्र मंत्र्यांनी हे संसदेला सांगायला हवे की यामुद्द्यावर पाकिस्तानची यापुढे काय भूमिका असणार.

पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री शिरिन मजारी यांनी संयुक्त राष्ट्राला आवाहन केले की त्यांनी मध्य पूर्वी आखातातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. ते म्हणाले की हिंसाग्रस्त क्षेत्रात युद्धाला प्रोस्ताहन देण्याने कोणतेही हित होणार नाही.

पाकिस्तानी खासदार शेरी रहमान म्हणाले की इराणी जनरल यांच्या हत्याने मध्य पूर्वेतील परिस्थिती गंभीर होऊ शकते. ते म्हणाले की आपण यावर विस्ताराने चर्चा करु. पाकिस्तानचे खासदार म्हणाले की अमेरिका आणि इराण दरम्यान वाढत्या तनावाच्या कारणाने पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट येऊ शकते कारण त्यांचा देश पूर्णता तेल आयातीवर विसंबून आहे. ते म्हणाले की आज इराणमवर हल्ला झाला आहे, उद्या पाकिस्तानवर हल्ला होईल. त्यांनी सवाल केला की अशी कोणतीही वाईट परिस्थिती समोर आली तर यासाठी सरकार तयार आहे का ?

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/