आता ‘खरे’ आणि ‘बनावट’ औषधे ओळखणे होणार ‘सोपे’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने औषधात वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅक्टिव फार्मास्युटिकल इनग्रीडिएंट्स (API) वर क्यूआर (QR) कोड लावणे अनिवार्य केले आहे. आता 8 सप्टेंबर पासून API वर QR कोड लावणे अनिवार्य असणार आहे. यामुळे बनावट आणि खऱ्या औषधांची तपासणी करणे सहज होणार आहे. याशिवाय औषधे बनवणारी कंपनी ट्रॅक करता येणार आहे.

काय आहे API ?
API म्हणजेच अ‍ॅक्टिव फार्मास्यूटिकल इनग्रीडिएंट्स. हे इंटरमीडिएट्स, टॅबलेट्स, कॅप्सूल्स आणि सिरपमध्ये असतात. मुख्यत: हे रॉ मटेरिअय असतात. कोणतेही औषध बनवणाऱ्या कंपनीला एपीआयची महत्वाची भूमिका असते आणि यामुळे API साठी भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात चीन वर अवलंबून आहे.

यासंबंधित सूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. QR कोडच्या माध्यमातून निर्माता आणि बॅच नंबरची आवश्यकता भासेल. यातून एक्सपायरी आणि इंपोर्टरची देखील माहिती मिळेल. भारत दरवर्षी १३,००० कोटी रुपयांच्या API आयात करतो.

खोटे API असणाऱ्या औषधांनी रुग्णांना फायदा होत नाही, DTAB म्हणजेच ड्रग्स टेक्निकल अ‍ॅडवायजरी बोर्डने जूनमध्ये प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. US च्या एका आवाहलात भारतात बनवण्यात आलेली २० टक्के औषधे खोटी आहेत. एका सरकारी नोकरी नुसार ३ टक्के औषधांचा दर्जा अत्यंत हलका असतो.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like