प्रथमच निरोगी व्यक्तीमध्ये मिळाला ‘हा’ DNA, शरीराचं ‘स्ट्रक्चर’ बदललं का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मानवी शरीर डीएनएने बनले आहे. म्हणजेच डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (डीएनए). आतापर्यंत आपल्या सर्वांना माहित होते की, डीएनएची रचना डबल हेलिक्स आहे. परंतु आता वैज्ञानिकांनी निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या पेशीमध्ये चार हेलिक्स डीएनए शोधले आहेत. डीएनए आता त्याची रचना बदलत आहे का हे समजून घेण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. मानवी शरीरावर त्याचा काय परिणाम होईल ते पाहूया…

डबल हेलिक्स डीएनएनेनेच मानवी शरीराची रचना होते. सामान्यत: (Quadruple Stranded DNA) चार हेलिक्स डीएनडए कर्करोगाच्या काही पेशींमध्ये आढळतात. किंवा ते प्रयोगशाळांमध्ये प्रयोगासाठी बनवले जातात.

प्रथमच निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या पेशीमध्ये चार हेलिक्स डीएनए आढळले आहेत. तेही कायम, सुरक्षित आहे आणि शरीराच्या आत सामान्य मार्गाने बनवले आहे.

इम्पेरियल कॉलेज लंडनचे वैज्ञानिक मार्को डी अँटोनियो म्हणतात की, हे चार हेलिक्स डीएनए पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. आता आम्हाला पुन्हा डीएनएच्या संरचनेचा नवीन अभ्यास सुरू करावा लागेल.

डीएनए चार न्यूक्लियोबेसपासून (Nucleobase) बनतो. हे ऍडीनिन (Adenine), सायटोसिन (Cytosine), ग्वानिन (Guanine) आणि थायमीन (Thymine) आहेत. हे चार शरीरात अवयव निर्माण करण्याच्या गरजेनुसार एकत्र येतात.

जेव्हा ग्वानिन त्याच्या तळाशी एक चौरस आकार तयार करतो तेव्हा चार हेलिक्स असलेला डीएनए तयार होतो. डीएनएमध्ये ग्वानिन हा एकमेव भाग आहे, जो स्वतःशी देखील कनेक्ट होऊ शकतो. पण उर्वरित न्यूक्लियोबेस हे करू शकत नाही.

मार्को डी अँटोनियो यांनी सांगितले की, डीएनए काय करते हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु कोणत्या सेलला कोणत्या जीन्सची आवश्यकता आहे हे आपल्याला माहित नाही. किंवा ते किती प्रथिने बनवेल. परंतु आता डीएनएच्या या नवीन संरचनेमुळे आपल्याला मानवी शरीरात प्रोटीनचा वापर आणि उत्पादन याबद्दल अधिक माहिती मिळेल.

अँटोनियो म्हणाले की, या चार हेलिक्स डीएनएच्या सहाय्याने अनुवांशिक कोडींग समजणे सोपे होऊ शकते. पण सध्या हे डीएनए कसे बनते हे समजून घ्यावे लागेल. सामान्यतः चार हेलिक्सचा डीएनए कर्करोगाच्या पेशींमध्ये आढळतो. पण आम्हाला तो एका निरोगी व्यक्तीच्या शरीरातून मिळाला आहे.

अँटोनियो म्हणाले की, डीएनएवर एपिजेनेटिक मार्कर्स (Epigenetic Markers) असतात, जे शरीरात जीन्स कमी होण्याच्या किंवा वाढण्याच्या प्रक्रियेदरम्यान दिसतात. तसेच ते या प्रक्रियेतही भाग घेतात. असे दिसते की, चार हेलिक्स डीएनए असेच काहीतरी काम करत असेल.

यूकेच्या पूर्व अँग्लिया विद्यापीठाचे जो वॉलर म्हणतात की, चार हेलिक्स डीएनएच्या पुराव्यांवरून असे सूचित होते की भविष्यात शरीराची निर्मिती यांच्याद्वारे होईल. मात्र आता आम्ही त्याला डीएनएचा सामान्य विकास मानत आहोत, जोपर्यंत आम्हाला चार हेलिक्स डीएनएचे आणखी एक उदाहरण सापडत नाही.