आता फक्त 15 मिनीटांमध्ये फुल ‘चार्ज’ होणार तुमचा फोन, आता आली जगातील पहिली 100W+ चार्जिंग ‘टेक्नॉलॉजी’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – क्वालकॉम (Qualcomm) ही स्मार्टफोन प्रोसेसर बनवणारी प्रसिद्ध कंपनी क्विक चार्ज 5 (Quick Charge 5) लवकरच आणणार आहे. ही जगातील पहिली 100W+ चार्जिंग सॉलूशन असून ही टेक्नोलॉजी 5 मिनिटात 0-50 टक्के पर्यंत चार्जिंग करत असल्याचा दावा केला आहे. महत्वाची बाब म्हणजे 15 मिनिटात तुमचा मोबाईल 100 टक्के चार्जिंग होईल. याअगोदर कंपनीने 2017 मध्ये Quick Charge 4+ आणलं होतं आता हे Quick Charge 5 च्या रुपात आलं आहे.

सुपर क्विक चार्जिंग ऐवजी याचे तंत्रज्ञान मागील व्हर्जनपेक्षा हे 10 टक्क्यांनी कुल (cool) राहील आणि याची क्षमता 70 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या हे तंत्रज्ञान टेस्टिंग फेजमध्ये आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यातच हे तंत्रज्ञान आपल्याला मोबाईल फोन मध्ये दिसेल. हे तंत्रज्ञान 2S बॅटरीला सपोर्ट करते. या तंत्रज्ञानाचा उपयोग USB पावर डिलीवरी (USB-PD) आणि यूएसबी Type-C टेक्नोलॉजीसाठी होऊ शकतो.

क्विक चार्ज 5 टेक्नॉलजी 100W पेक्षा जास्त चार्जिंग क्षमता सपोर्टची असून आणि जुनी टेक्नोलॉजी 45W सोबत येत होती. जुनी टेक्नॉलॉजी 4000mAh या बॅटरीला चार्जिंग करताना 10 डिग्री पर्यंत गरम होत होती. आताच्या तंत्रज्ञानामुळे हीच बॅटरी 15 मिनिटात 100 टक्के चार्जिंग होईल. दुसऱ्या बाजूला क्विक चार्ज 4+ वेळेस बॅटरी चार्जिंग करताना 15 मिनिटात 15 टक्केच चार्जिंग होत होती.

सुरुवातीला हे तंत्रज्ञान स्नैपड्रैगन 865, स्नैपड्रैगन 865 प्लस प्रोसेसर आणि नेक्स्ट जनरेशन प्रीमियम आणि हाई टीयर स्नैपड्रैगन मोबाइल प्लेटफॉर्म्स ला सपोर्ट करेल.