उस्मानाबादमध्ये क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीने विष पिऊन केली आत्महत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात कोरोनाबाधित संशयित व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात आले होते. क्वारंटाइन असताना या व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना येडशी गावात घडली. ही व्यक्ती तिरुपती देवस्थानला जाऊन आली होती. त्यानंतर त्याच्यासह संपर्कात आलेल्या इतर सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते.

क्वारंटाइन असताना या व्यक्तीवर उस्मानाबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. पण, त्यानंतरही तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यात नेण्यात आले होते. त्यानंतर याव्यक्तीला पुन्हा गावी आणण्यात आले होते. क्वारंटाइन असताना विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याने टोकाचे पाऊल का उचलले याबद्दल माहिती कळू शकली नाही. क्वारंटाइन असताना विष कुठून मिळाले असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.